– शंभर टक्के मतदानासाठी
व्यापार हिंदुस्थान प्रतिनिधी
मुंबई
विविध पद्धतीच्या जिहादाद्वारे या देशात आपल्या महाराष्ट्राचे तालिबानीकरण करण्याचा डाव जिहादींना विरोधी पक्षांना हाताशी घेत मांडला आहे. लोकसभा निवडणुकीत ते चित्र स्पष्ट दिसले. यामुळेच आता ‘कटू नका, बटू नका, संघटित व्हा आणि शंभर टक्के मतदान एकगठ्ठ्याने करा, हिंदूंचे लोंढेच्या लोंढे मतदानासाठी बाहेर पडताना दिसायला हवेत’, यासंबंधी विशेष व्याख्यान गुरूवारी ठाण्यात होत आहे.
ज्येष्ठ पत्रकार, व्याख्याते व राजकीय-सामाजिक विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर त्यामध्ये विकासासाठी, राष्ट्रहितासाठी व महाराष्ट्रासाठी शंभर टक्के मतदान, हा विषय मांडणार आहेत. दीनदयाळ प्रेरणा केंद्र आणि श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासाने हे व्याख्यान आयोजित केले आहे. राष्ट्रहितासाठी, आपल्या राष्ट्राची सांस्कृतिक ओळख पुसली जाऊ नये यासाठी ‘सजग रहो’ अभियान आयोजित करण्यात आले आहे. याअंतर्गत हे व्याख्यान होत आहे.
चला तर मग, शंभर टक्के मतदानाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी गुरूवार, ७ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता भेटूयात. ठाणे पश्चिमेकडील घंटाळी, सहयोग मंदिर येथे पहिल्या मजल्यावरील सभागृहात. एकच ध्यास १०० टक्के मतदान आपल्या संस्कृतीसाठी, आपल्या राष्ट्रासाठी, महाराष्ट्र वाचविण्यासाठी.