– दादरमध्ये आज रामगिरी महाराजांचे व्याख्यान
– शिवभक्त संमेलन
व्यापार हिंदुस्थान प्रतिनिधी
मुंबई
आधी लव्ह जिहाद, मग लँड जिहाद व आता व्होट जिहाद, या स्थितीत आपल्या हिंदू समाजाला वाचवायचे असल्यास छत्रपती शिवरायांचा आदर्श बाळगावावाच लागेल. केवळ त्याच विचारात जिहादपासून स्वत:ला सजग करण्याची ताकद आहे. यासंबंधी परमपूज्य रामगिरी महाराजांचे व्याख्यान शिवभक्त संमेलनात सोमवारी होणार आहे. दादर येथे महाराजांचा आवाज गुंजणार आहे.
एकगठ्ठा होऊन, एकत्र येत हिंदू संस्कृतीवर हल्ला करण्याचे काम सध्या जिहादी समाजाकडून सुरू आहे. याचा सामना करण्यासाठी नेमके काय करावे, यासंबंधी परमपूज्य रामगिरी महाराज व्याख्यान देणार आहेत. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचालित श्रीशिवशंभू विचार मंचने हा कार्यक्रम दादर येथे आयोजित केला आहे.
सोमवार, ४ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता दादर पूर्वेकडील हिंदू कॉलनीतील राजा शिवाजी संकुलातील ब.न. वैद्य सभागृहात हे व्याख्यान होत आहे. ‘शिवरायांच्या आदर्शावर चालणारा सजग हिंदू समाज : काळाची गरज’, असा व्याख्यानाचा विषय आहे. यासाठी समस्त हिंदू बंधू-भगिनी तसा राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रांत संयोजक सुधीर थोरात व कोकण प्रांत संयोजक अभय जगताप यांनी केले आहे.