समृद्ध राष्ट्र, समृद्ध व्यापार
अपना व्यापार, अपना समाचार
HomeStock Marketशेअर बाजार: सुरूवात संथ, मात्र नंतर वेगाची शक्यता

शेअर बाजार: सुरूवात संथ, मात्र नंतर वेगाची शक्यता

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा परिणाम सकारात्मक, मात्र गिफ्ट निफ्टी नकारात्मक
व्यापार हिंदूस्थान प्रतिनिधी
मुंबई
गुरूवारी निफ्टीच्या एक्स्पायरीला शेअर बाजार हळू सुरुवातीनंतर वेग घेण्याची शक्यता आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्याचा आनंद भारतासह जगभरातील सर्वच शेअर बाजारात आहे. त्याचे सकारात्मक परिणाम असले तरिही, ‘गिफ्ट निफ्टी’ सध्या आश्चर्यकारकरित्या नकारात्मक स्थितीत आहे.
दिवाळीतील जोरदार उत्साहानंतरही आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे भारतीय शेअर बाजार नकारात्मक किंवा संथ अवस्थेत होते. बाजारात व्हाल्यूमच नसल्याचे सांगितले जात आहे. या स्थितीत बुधवारी मात्र ट्रम्प यांच्या विजयामुळे बाजारात उत्साह परतल्याचे दिसून आले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी ५०’ निर्देशांक १.१२ टक्के वाढीसह २४ हजार ५०० च्या जवळ पोहोचला, बँक निफ्टी ५२ हजारांच्यावर राहिला तर मुंबई शेअर बाजाराच्या सेनसेक्सने ९०० अकांची उसळी घेत पुन्हा एकदा ८० हजारांचा भावनिक टप्पा पार केला आहे. हाच उत्साह वास्तवात गुरूवारीदेखील कायम राहू शकेल. मात्र किंचीत धाकधूक अद्यापही असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
‘गिफ्ट निफ्टी’ या धाकधुकीचे कारण ठरत आहे. जगभरातील सर्वच शेअर बाजार १ ते २ टक्का वाढीसह डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचे स्वागत करीत असताना ‘गिफ्ट निफ्टी’ मात्र सावध पावले टाकत आहे. लाल रंगात खुला झाल्यानंतर ‘गिफ्ट निफ्टी’ जेमतेम ०.०५ टक्के हिरव्या रंगात आहे. त्याचवेळी सिंगापूरचा एसजीएक्स निफ्टीदेखील काहिसा नकारात्मक आहे. यामुळेच भारतीय शेअर बाजारांची सुरूवातदेखील संथ होऊन नंतर ते वेग पकडतील, असा अंदाज बांधला जात आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments