समृद्ध राष्ट्र, समृद्ध व्यापार
अपना व्यापार, अपना समाचार
HomeVyaparखाद्यतेल भीषण संकटात : शंकरभाई ठक्कर

खाद्यतेल भीषण संकटात : शंकरभाई ठक्कर

– सरकारने उचलावीत तातडीची पावले
व्यापार हिंदूस्थान प्रतिनिधी,
मुंबई
‘खाद्यतेलांची वैश्विक समिकरणे बदलली आहेत. त्यातून भीषण दरवाढीची भीती आहे. आगामी काळातील दरवाढ रोखण्यासाठी सरकारने तातडीची पावली उचलण्याची गरज आहे’, अशी कळकळीची मागणी अखिल भारतीय खाद्यतेल असोसिएशनचे राष्ट्रेय अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी केली आहे.
भारत हा जगातील सर्वाधिक खाद्यतेल मागणी असलेला देश आहे. भारतात एकूण मागणीच्या ७० टक्के खाद्यतेलाची आयात होते. त्यातील ८० टक्के आयात ही पामतेलाची असते. जवळपास सर्व रेस्तरां, हॉटेल्स, धाबे, खाद्यान्न स्टॉल्स यावर पामतेलाचाच वापर होतो. यामुळेच एकूण खाद्यतेल मागणीत पामतेल सर्वाधिक आहे. भारताला सातत्याने मलेशिया, इंडोनेशिया व थायलंडहून खाद्यतेल आयात करावे लागते. या संधीचा फायदा घेत इंडोनेशिया व मलेशियाने पामतेल निर्यात शुल्कात वाढ केली असताना तिसरे मोठे उत्पादक असलेल्या थायलंडने कमी उत्पादनामुळे निर्यातबंदी केली आहे. या सर्वांचा भारताच्या खाद्यतेल व्यवसायावर भीषण परिणाम झाला आहे.
यातून भारतात पामतेल आयातीचे गणित बिघडले आहे. ऐन सणासुदीत व आगामी विवाह मोसमात खाद्यतेल सर्वसामान्यांचा खिसा हलका करण्याची शक्यता असून सध्या दिवाळीतच किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या दरांत १२ ते १४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

शंकरभाई ठक्कर यांनी सांगितले की, ‘यंदा थायलंडमध्ये ८ ते ९ लाख टन पामच्या उत्पादनाची शक्यता आहे. मात्र हा आकडा मागीलवर्षीपेक्षा २५ टक्क्यांहून कमी आहे. त्यामुळे थायलंडने यंदा पाम निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. ही संधी साधत इंडोनेशियाने पाम निर्यातीत प्रति टन ६८.३३ डॉलरची (साडे सात टक्के) दरवाढ केली आहे. देशात ४८ तासांतच पामतेल व पर्यायाने अन्य खाद्यतेलांच्या किमतीत ५ रुपये प्रति किलोची वाढ झाली आहे.’

भारत पामतेलासोबतच सूर्यफुल तेलाचीदेखील मोठ्या प्रमाणावर आयात करतो. त्यात रशिया व युक्रेन आघाडीवर आहेत. पाम दरात वाढ होत असताना रशियानेदेखील सूर्यफुल तेलावरील निर्यात शुल्कवाढीचा निर्णय घेतला आहे. या सर्वांचे भीषण परिणाम येत्या काळात भारतीय खाद्यतेलांवर होण्याची शक्यता असून आत्ताच दरवाढ होऊ लागली आहे. या स्थितीबाबत व्यापाऱ्यांनी सजग राहून आपल्या देशातील नागरिकांना खाद्यतेल महागाईच्या झळा बसू यासाठी सजण राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments