समृद्ध राष्ट्र, समृद्ध व्यापार
अपना व्यापार, अपना समाचार
HomeVyaparछठ पुजेचा ‘आत्मनिर्भर व्यापार’ १२ हजार कोटींचा : कॅट

छठ पुजेचा ‘आत्मनिर्भर व्यापार’ १२ हजार कोटींचा : कॅट

आपले उत्सव, आपली संस्कृती व्यापाऱ्यांसाठी लाभदायी
व्यापार हिंदूस्थान प्रतिनिधी
मुंबई
भारतीय व हिंदू संस्कृती ही संपूर्ण समाजाला जोडणाऱ्या तथ्यावर वसली आहे. येथील प्रत्येक सण, उत्सव हे संपूर्ण समाजाचे हित करणारे असतात. यामुळेच तर दिवाळीने या देशाला ४ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय दिल्यानंतर छठ पुजेनेदेखील १२ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय या देशाला दिला. हा एकप्रकारे ‘आत्मनिर्भर व्यापार’ होता.
अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (कॅट) राष्ट्रीय सचिव व अखिल भारतीय खाद्यतेल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर यांच्यानुसार, यंदा छठ पूजा ५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान होती. चार दिवसांचा हा उत्सव पूर्व भारतात सर्वाधिक साजरा होतो. प्रामुख्याने बिहार, झारखंड व ओदिशामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. त्याठिकाणी या पुजेनिमित्त विविध प्रकारची उत्सवी खरेदी झाली. तो आकडा देशातील व्यापाऱ्यांसाठी लाभदायी होता. अशा सर्वांच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल झाली व त्यात भारतीय व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री झाली. याद्वारे एकप्रकारे ‘आत्मनिर्भर भारत’ ला बळ मिळाले.’
ठक्कर यांनी सांगितले की, पूर्व भारतातील अनेक जण महामुंबईत कामानिमित्त वास्तव्यास आहेत. त्यामुळे जे गावी जाऊ शकले नाहीत, त्यांनीदेखील हा उत्सव जोमाने साजरा केला. मुंबईत काळबादेवी, परळ, घाटकोपर, कुर्ला, वांद्रे, गोरेगाव, जोगेश्वरी, कल्याण, वाशी, पनवेल, मानखुर्द या भागात हा उत्सव साजरा झाला. त्यामध्ये कपडे, फळं, फूलं, भाज्या, मिठाई व मातीच्या चुलींसह अन्य लहान वस्तूंची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात झाली. हा आकडा तब्बल ४०० कोटी रुपयांच्या घरात होता. आपली संस्कृती सर्वसामवेशक असून व्यवसायाला बळ देणारी असल्याचे हे द्योतक आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments