आपल्या या भारतभूमीचे तालिबान करू पाहणाऱ्या विरोधकांची सत्ता या महाराष्ट्र राज्यावर, मराठी भूमीवर येऊ द्यायची नसल्यास, प्रत्येक राष्ट्रप्रेमी हिंदूने मतदानासाठी बाहेर पडणे आवश्यक आहे. हिंदू केवळ जन्माने असून उपयोग नाही, तर तो व्यवहाराने, त्याच्यातील गुणांसह धर्मनिरपेक्षतेऐवजी खऱ्या अर्थाने समरसतेची जपणूक करणारा सनातनी व या भारतभूमीला आपली माता मानणारा हवा. असा प्रत्येक हिंदू येत्या २० तारखेला राष्ट्रहिताचे रक्षण करणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी घराबाहेर पडला नाही तर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या व तिचे संरक्षण करणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मराठी भूमीत तालिबानी राजवटीची बीजे विरोधक रोवतील. त्यातून पुढील पाच वर्षे आपल्याला आपले उत्सव, सणदेखील सार्वजनिक साजरे करता येणार नाहीत.
ही सर्व भीती असल्यानेच ‘बुद्धी व्हावी हिंदूंना मतदान करण्याची !’ अशा आशयाचे एक अप्रतिम निरुपण श्लोक सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाले आहे. २० नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी हिंदूंचे लोंढे याद्वारे मतदानासाठी बाहेर पडावेत, अशी अपेक्षा यातून व्यक्त होत आहे.