व्यापार हिंदूस्थान प्रतिनिधी
मुंबई
लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी चांगल्या उमेदवारांना कमी मतांमुळे पराभव पत्करावा लागल्याचे दिसले. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीत हे होऊ नये यासाठी राष्ट्रप्रेमींच्या १०० टक्के मतदानाची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रीय मतदार मंचांतर्गत कार्यरत मातृशक्ती व भगिनींनी पुढाकार घेतला आहे.
याअंतर्गत आज ठाणे विधानसभा क्षेत्रात चार विविध कार्यक्रम होत आहेत. आपल्या भागातील ‘मतदारराजा जागा हो, जागा हो’, ‘१०० टक्के मतदानासाठी बाहेर पड’, असे आवाहन करणारे पथनाट्ये याअंतर्गत सादर होणार आहे. ते पाहण्यासाठी व एकूणच या जनजागृतीचा अनुभव घेण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहण्याची गरज आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक असे
१. घाणेकर नाट्यगृह चौक : संध्याकाळी 5.30 वाजता
२. TJSB bank वाघबीळ : संध्याकाळी 6.30 वाजता
३. नमो सेंट्रल पार्क समोर, कोलशेत रोड : संध्याकाळी 7.15 वाजता
४. लोढा आमारा सोसायटी : रात्री 8.00 वाजता.