मराठवाडा, खांदेशात घेणार बैठका
व्यापार हिंदूस्थान प्रतिनिधी
मुंबई
अखिल भारतीय व्यापारी महासंघ (कॅट) या देशातील सर्वात मोठ्या व्यापारी संघटनेचे सरचिटणीस व भाजपचे खासदार प्रवीण खंडेलवाल आजपासून तीन दिवस महाराष्ट्रात डेरेदाखल झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत हिंदूंचे १०० टक्के संघटन होण्याच्यादृष्टीने ते मराठवाडा व खांदेशात बैठका घेणार आहेत.
‘कॅट’ ही देशभरातील ४० हजार व्यापारी संघटनांच्या ९ कोटी सदस्यांची देशातील सर्वात मोठी व्यापारी संघटना आहे. खंडेलवाल यांनी सरचिटणीस म्हणून कार्य करताना देशभरातील व्यापाऱ्यांना या संघटनेच्या माध्यमातून एका माळेत गुंफण्याचे काम केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर खंडेलवाल विधानसभा निवडणुकीत शत प्रतिशत मतदानाबाबत व्यापाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्रात आले आहेत.
‘कॅट’चे राष्ट्रीय सचिव शंकरभाई ठक्कर यांच्यानुसार, ‘खंडेलवाल हे आज दिवसभर छत्रपती संभाजीनगरात आहेत. तेथे फुलंब्री व छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील व्यापाऱ्यांशी ते संवाद साधत आहेत. तेथून ते शनिवारी सकाळी माजलगावला जातील. दिवसभर माजलगाव व लातूर मतदारसंघातील व्यापाऱ्यांशी संवाद साधून शनिवारी रात्री जळगावात येतील. रविवारी ते राजस्थानी मेळाव्यात राजस्थानी व्यापाऱ्यांशी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांसह संवाद साधतील. तेथून धुळ्यात व्यापाऱ्यांची भेट घेणार आहेत. या सर्व कार्यक्रमात व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आहे.’
प्रवीण खंडेलवाल यांचा कार्यक्रम असा
शुक्रवार
– रात्री ८.३० वाजता : छत्रपती संभाजीनगर बैठक व सहभोज
शनिवार
– सकाळी १० वाजता : सुखसागर हॉल, माजलगाव व्यापारी संघाशी चर्चा
– दुपारी २ नंतर : लातूर व्यापाऱ्यांशी संवाद
रविवार
– सकाळी ११ ते १२ : जळगावात राजस्थानी मेळावा (राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांसह)
– दुपारी १२ ते १ : कॅटच्या सदस्यांशी चर्चा
– दुपारी ३.३० ते ४.३० : धुळे व्यापाऱ्यांशी संवाद