समृद्ध राष्ट्र, समृद्ध व्यापार
अपना व्यापार, अपना समाचार
HomeOtherसकल ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा

सकल ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा

हिंदुत्वाच्या रक्षणार्थ निर्णय

व्यापार हिंदूस्थान प्रतिनिधी
मुंबई
आधी लव्ह जिहाद, मग लँड जिहाद व आता व्होट जिहाद, या स्थितीत आपल्या हिंदू समाज भीषण संकटात आला आहे. राज्याचा तालिबान करण्याच्या उद्देशाने व्होट जिहादच्या माध्यमातून विरोधी पक्षांनी अल्पसंख्याक समाजाला हाताशी घेतले आहे. या स्थितीत आपली संस्कृती, देव अन धर्म भीषण संकटात सापडलेत. त्यांच्या रक्षणार्थ सकल ब्राह्मण समाजाने भाजप व महायुतीला संपूर्ण पाठिंबा जाहिर केला आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाला आणि त्यासोबतच्या महायुतीला सकल ब्राह्मण समाज एकमुखाने पाठिंबा जाहीर करीत असल्याची घोषणा ब्राह्मण संघटनांचे मुख्य समन्वयक भालचंद्र कुलकर्णी आणि समन्वयक चैतन्य जोशी, मयुरेश अरगडे यांनी केली आहे. भाजपबरोबरच शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी पार्टी (अजित पवार गट) यांच्या महायुतीने ब्राह्मण समाजातील उमेदवारांनादेखील प्राधान्य दिल्याने हा पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यातील विविध ठिकाणच्या मतदारसंघांमध्ये ब्राह्मण समाजाचा देखील विचार करावा अशी आमची मागणी होती, त्यावर भाजप व महायुतीने सकारात्मक विचार केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (नागपूर दक्षिण-पश्चिम) यांच्या सक्षम नेतृत्वाखाली ही निवडणूक होत आहे, त्यांच्याबरोबरच संजय केळकर (ठाणे), अतुल भातखळकर (कांदिवली), पराग अळवणी (विलेपार्ले), राजन नाईक (नालासोपारा), सुधीर गाडगीळ (सांगली) तसेच उदय सामंत (रत्नागिरी), किरण सामंत (राजापूर) या ब्राह्मण समाजातील उमेदवारांना निवडणूकीत उमेदवारी मिळाल्याने भाजपने सर्वसमावेशक असा विचार केल्याचे दिसून येते. त्याचबरोबर भाजपच्या राज्यातील संघटनात्मक कामाची महत्वपूर्ण जबाबदारीच्या महामंत्रीपदी राजेश पांडे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे तर कोथरुडच्या माजी आमदार प्रा. मेधाताई कुलकर्णी यांची राज्यसभा खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याने ब्राह्मण समाजाबद्दल भाजपने दाखवलेल्या सकारात्मक भावनेची आम्ही आनंदाने दखल घेत आहोत, असे समाजाचे म्हटले आहे.
हिंदुत्वाची पताका आपल्या खांद्यावर घेवून अधिक सकारात्मक काम करणारा राष्ट्रसमर्पित असलेला ब्राह्मण समाज आहे. या समाजाप्रती अत्यंत चांगली अशी सकारात्मक वागणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यात सुरुवातीला खुल्या प्रवर्गासाठी अमृत महामंडळ दिले तर नुकतेच ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे स्वतंत्र महामंडळ देखील दिले आहे. याची सार्थ जाणीव आम्हा सर्वांना आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर ब्राह्मण समाजाने कायमच भाजपला साथ दिलेली आहे. राज्यातील सध्याचे वातावरण पाहता हिंदुत्वाचा मुद्दा भाजपने केंद्रस्थानी ठेवला आहे व हीच ब्राह्मण समाजाची देखील भूमिका आहे. आम्ही खालील सर्व ब्राह्मण संस्था, संघटनांचे पदाधिकारी हिंदुत्वाचा जयघोष व्हावा या हेतूने भारतीय जनता पक्षाला आणि त्यासोबतच्या महायुतीला जाहीर संपूर्ण पाठिंबा देत असल्याची घोषणा सकल ब्राह्मण समाजाने केली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments