समृद्ध राष्ट्र, समृद्ध व्यापार
अपना व्यापार, अपना समाचार
HomeBusinessव्हॅन ह्युसनचा इव्हिनिंगवेअर विभागात प्रवेश

व्हॅन ह्युसनचा इव्हिनिंगवेअर विभागात प्रवेश

– स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी ‘व्हीएच इव्हिनिंग’ हा नवीन सबब्रॅण्ड ग्राहकांपुढे सादर

व्यापार हिंदुस्थान प्रतिनिधी
मुंबई

अव्वल दर्जाच्या फॉर्मल व वेडिंग वेअरसाठी दीर्घकाळापासून ओळखल्या जाणारा व्हॅन ह्युसन हा आदित्य बिर्ला फॅशन अँड रिलेटल लिमिटेडचा ब्रॅण्ड, ‘व्हीएच इव्हिनिंग’ या सबब्रॅण्डच्या (उपब्रॅण्ड) माध्यमातून एका नवीन प्रवर्गात प्रवेश करत आहे. संध्याकाळी घालण्याच्या वस्त्रांना नवा चेहरा देण्याच्या दृष्टीने ही नवोन्मेषकारी उत्पादश्रेणी विकसित करण्यात आली आहे. इव्हिनिंगवेअर या बोलक्या प्रवर्गात प्रवेश करणारी व्हीएच इव्हिनिंग पुरुष व स्त्रिया दोघांसाठी कपडे डिझाइन करत आहे, पारंपरिक ऑफिसवेअरहून वेगळे शैलीदार, ड्रेस्डअप (फॉर्मलवेअरहून वेगळे) कॅज्युअल्स या उत्पादनश्रेणीत आहेत. आफ्टर-अवर्स शैलीचा मेळ आधुनिकतेशी घालून हे कपडे तयार करण्यात आले आहेत. व्हीएच इव्हिनिंग ग्राहकांपुढे ठेवण्यातून, अव्वल दर्जाच्या कॅज्युअल व इव्हिनिंगवेअरमध्ये कलाप्रेरित फॅशन आणण्याप्रती, अभिजाततेचा मेळ ताज्या व बहुआयामी लूक्सशी घालण्याप्रती, व्हॅन ह्युसनची बांधिलकी दिसून येते.

उच्च दर्जाच्या फॉर्मल कपड्यांबाबत असलेल्या आपल्या लौकिकाच्या आणखी पुढे जात व्हॅन ह्युसनने व्हीएच इव्हिनिंगच्या माध्यमातून आधुनिक व्यावसायिकांच्या उत्क्रांत होत जाणाऱ्या फॅशनविषय संवेदनशीलतेला प्रतिसाद दिला आहे. ‘कॅज्युअलायझेशन’चे प्रवाह सातत्याने क्षेत्राला नवीन आकार देत असल्यामुळे औपचारिकता व सहजसौंदर्य यांचा समतोल साधणाऱ्या पोशाखांना असलेली मागणी वाढत आहे. फॉर्मल व कॅज्युअल कपड्यांतील अंतर नाहीसे करणारे कपडे ग्राहकांना हवे आहेत. हा नवीन सबब्रॅण्ड इव्हिनिंगवेअर प्रवर्गातील कपडे ठळक व बोलक्या स्वरूपात प्रस्तुत करत आहे, स्त्री-पुरुषांना त्यांचा कामावर नसतानाचा लूक अधिक चांगला करण्याची संधी देण्याचा तसेच व्हॅन ह्युसनची ओळख असलेली सफाई व उत्कृष्टता कायम ठेवण्याचा या सबब्रॅण्डचा प्रयत्न आहे.
अभिरूचीपूर्ण इव्हिनिंगवेअर
‘व्हॅन ह्युसनच्या माध्यमातून आम्ही कायम बदलत्या ग्राहक पसंतीच्या पुढे राहण्यासाठी प्रयत्नशील असतो, व्हीएच इव्हिनिंग ही आमच्या बांधिलकीची पावती आहे. अभिजाततेशी कोणतीही तडजोड न करता ठळक अभिव्यक्तीला मुभा देणाऱ्या अभिरूचीपूर्ण इव्हिनिंगवेअरच्या क्षेत्रात बाजारपेठेत लक्षणीय तफावत असल्याचे आमच्या लक्षात आले. व्हीएच इव्हिनिंग ही मागणी तर पूर्ण करतेच पण व्यक्तीत्व, सफाई व वैविध्य यांचा अखंड संयोग साधणाऱ्या प्रवर्गाला नवीन ओळखही देते. व्यक्तींना आत्मविश्वासाने वेगळे उठून दिसण्यास सक्षम करण्याच्या दृष्टीने हा नवीन सबब्रॅण्ड डिझाइन करण्यात आला आहे, आधुनिक ग्राहकाची ओळख असलेली शैली व सघनता यांचा संयोग यामध्ये आहे.’

अभय बहुगुणे

मुख्य कार्यपालन अधिकारी (सीओओ), व्हॅन ह्यूसन

पदार्पणातील कलेक्शन ‘बॉर्न ऑफ आर्ट’ हे इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या कला चळवळींपासून प्रेरणा घेत विचारपूर्वक तयार करण्यात आले आहे. यात रेनेसाँ, क्युबिझम आणि इंप्रेशनिझम या चळवळींचा समावेश होतो. अभिजात व समकालीन प्रभावांच्या मिश्रणातून हे कलेक्शन सर्जनशील तत्त्वे जिवंत करते. कोणत्याही स्वरूपातील कलेला दाद देणाऱ्या आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग म्हणून कला परिधान करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी हे कलेक्शन तयार करण्यात आले आहे. लक्षणीय बाब म्हणजे, दिवस ते रात्र हे स्थित्यंतर विनासायास पार पडेल अशा दृष्टीने ‘बॉर्न ऑफ आर्ट’मधील उत्पादने डिझाइन करण्यात आली आहेत. फॉर्मल व कॅज्युअल लूक्समधील अंतर भरून काढण्याचा प्रयत्न या उत्पादनांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
अत्‍याधुनिक डिझाइनचे मिश्रण
‘बॉर्न ऑफ आर्ट’ कलेक्‍शन कालातीत कलाकृती व अत्‍याधुनिक डिझाइनचे मिश्रण करत इव्हिनिंगवेअरच्‍या पैलूला नव्‍या उंचीवर घेऊन जाते. व्‍हीएच इव्हिनिंगसह आम्‍ही लाइन डिझाइन केली आहे, जेथे आकर्षक, स्‍टेटमेंट प्रिंट्सपर्यंत सर्वकाही रेनेसन्‍स व कुबिस्‍ट आर्टपासून प्रेरित आहे, जेथे कलात्‍मक मोटिफ्स सारख्‍या सुधारित बाबींचा अनुभव मिळतो आणि सर्जनशीलता व व्‍यक्तिमत्त्वाची कथा व्‍यक्‍त होते. हे कलेक्‍शन डिझाइनमधील उत्‍क्रांती असण्‍यासोबत साहसी मत जाहीर करते की, कला व फॅशन एकत्र येत वीअरेबल मास्‍टरपीस तयार करू शकतात. व्‍हीएच इव्हिनिंग आधुनिक व्‍यावसायिकांना लक्षवेधक, पण अत्‍याधुनिक स्‍टेटमेंट करण्‍यास, तसेच स्‍वयं-अभिव्‍यक्‍तीसाठी प्रत्‍येक क्षणाला कॅन्‍व्‍हासवर सादर करण्‍यास सक्षम करते.’

गौरव रहेजा

डिझाइन संचालक, व्हॅन ह्यूसन

बॉर्न ऑफ आर्ट कलेक्शन: फॅशन व फाइन आर्टचे मिश्रण
रेनोसाँ, क्युबिझम आणि इंप्रेशनॅलिझम यांसारख्या कला चळवळींपासून प्रेरणा घेत, ‘बॉर्न ऑफ आर्ट’ कलेक्शन कलात्मक अभिव्यक्ती व व्यक्तीत्व साजरे करते. यातील प्रत्येक उत्पादन कालातीत कलाप्रभाव दाखवण्याच्या दृष्टीने कष्टाने तयार करण्यात आले आहे. आधुनिक व्यावसायिकांच्या अभिरूचीला साजेशा भविष्यकालीन डिझाइन्सचा समावेश यात करण्यात आला आहे.
  •  या कलेक्शनमध्ये स्त्री व पुरुष दोघांसाठी कपड्यांची विस्तृत श्रेणी आहे. उत्कृष्टरित्या डिझाइन करण्यात आलेले ब्लेझर्स, आधुनिक सूट्स आणि ड्रेसेसपासून शर्टस् व टीशर्टसपर्यंत संध्याकाळच्या कोणत्याही प्रसंगाला किंवा समारंभाला साजेशा वैविध्यपूर्ण उत्पादनांचा या कलेक्शनमध्ये समावेश आहे.
     डिझाइन तत्त्वांमध्ये कमालवादी (मॅक्झिमलिस्ट) व किमानवादी (मिनिमलिस्ट) सौंदर्यशास्त्राचा अंतर्भाव करण्यात आला आहे. काही उत्पादनांमध्ये ठळक, कलाप्रेरित प्रिंट्स आहेत, तर काही उत्पादनांचा भर सूक्ष्म तपशिलांवर आहे. यामध्ये लाइनिंग्जमध्ये किंवा अंडर कॉलर्सवर कलात्मक आकृती आहेत, त्यामुळे पोशाखाच्या अभिजाततेत भर पडली आहे.
     आधुनिक सिल्हूट्ससह तयार करण्यात आलेल्या ‘बॉर्न ऑफ आर्ट’ कलेक्शनमध्ये सफाईदार तरीही आरामशीर सौंदर्य आहे. फॅशन व कार्य या दोन्हींना महत्त्व देणाऱ्या तरुण व्यावसायिकांसाठी हे तयार करण्यात आले आहे. व्हीएच इव्हिनिंगमुळे व्हॅन ह्युसनला कला व फॅशन यांच्यातील छेदनबिंदूवर स्थान मिळाले आहे, या उत्पादनांमुळे व्यक्तींना अनन्यसाधारण, शैलीदार व सफाईदार पोशाखांच्या माध्यमातून आपले व्यक्तिमत्व अभिव्यक्त करण्यात मदत होते.
कलेने प्रेरणा दिलेले अभियान: ‘फ्रेम’
व्हीएच इव्हिनिंगच्या पदार्पणाला सहाय्य करणाऱ्या ‘फ्रेम’ या सांगोपांग मार्केटिंग अभियानाच्या माध्यमातून व्हॅन ह्युसन सर्जनशीलतेच्या सीमा ओलांडत आहे. कलाजगतापासून थेट प्रेरणा घेत ‘फ्रेम’ या कलेक्शनमधील प्रत्येक उत्पादनाकडे परिधान करण्याजोगी अप्रतिम कलाकृती म्हणून बघते, स्वत:बाबत सजग ग्राहकांसाठी परिधान करण्याजोगी कला या संकल्पनेवर यात भर दिला आहे. या अभियानातील प्रत्येक दृश्य, चित्र हे कलादालनासारख्या पार्श्वभूमीवर घेण्यात आले आहे, यातून फॅशन व ललित कला यांच्यातील संबंध अधोरेखित होतो. कलादालनातील मॉडेल्स, प्रदर्शनासाठी मांडलेल्या कलाकृती, कलेचा रसास्वाद व फॅशन अभिव्यक्ती यांच्यातील सीमारेषा धूसर करणारे बुडवून टाकणारे अनुभव यांची रेलचेल महत्त्वाच्या दृश्यांमध्ये आहे. व्हीएच इव्हिनिंगला चिकित्सक ग्राहकांच्या पसंतीचे लेबल म्हणून प्रस्थापित करण्याचे लक्ष्य या अभियानापुढे आहे, फॅशनच्या बाबतीत प्रगतीशील व व्यावसायिक अशा दोन्ही विभागांसाठी हा सबब्रॅण्ड परिपूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. डिजिटल, मुद्रित व आउट-ऑफ-होम प्लॅटफॉर्म्सद्वारे जास्तीत-जास्त लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा माध्यम योजनांमध्ये समावेश आहे. त्याद्वारे भारतभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे.
व्हीएच इव्हिनिंगच्या माध्यमातून व्हॅन ह्युसनने केवळ एक नवीन लाइन बाजारात आणलेली नाही, तर कला व फॅशन यांच्या संयोगाच्या केंद्रस्थानी स्वत:ला प्रस्थापित केले आहे. या कलेक्शनमध्ये कलात्मक अभिव्यक्तीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे आणि कलात्मक व्यक्तींना त्या जे काही परिधान करतात, त्याच्या माध्यमातून स्वत:ला व्यक्त करण्यात मदत करणे, प्रत्येक उत्पादनाला केवळ कपडा म्हणून नव्हे तर एक विधान म्हणून प्रस्तुत करणे या ब्रॅण्डच्या उद्दिष्टाशी हे सुसंगत आहे.
बॉर्न ऑफ आर्ट कलेक्शन व्हॅन ह्युसनच्या देशभरातील स्टोअर्समध्ये तसेच ऑनलाइनही उपलब्ध आहेत. लाँचचा भाग म्हणून ग्राहकांना मोठ्या शहरांमध्ये अनोख्या पॉप-अप गॅलरी समारंभांच्या माध्यमातून या कलेक्शनचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे कलेक्शनची कलाप्रेरित ही थीम आणखी स्पष्ट होईल.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments