होंडाची नवीन ‘२०२५ एसपी १२५’ दमदार बाईक
– मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे दमदार लाँचिंग
– ‘बी बोल्ड, बी अॅडवान्स्ड’ ब्रीदवाक्य
व्यापार हिंदूस्थान प्रतिनिधी
मुंबई
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय)ने नवीन ‘२०२५ एसपी १२५’ लाँच केली आहे. आगामी ‘ओबीडी२बी’ नियमनांशी सुसंगत असलेल्या अपग्रेडेड एसपी १२५ मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुधारित डिझाइन आणि नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. नवीन ‘२०२५ होंडा एसपी १२५’ ची किंमत मात्र ९१ हजार ७७१ रूपयांपासून (एक्स-शोरूम दिल्ली) सुरू होते.
‘आम्हाला नवीन ओबीडी२बी-प्रमाणित एसपी १२५च्या लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. अपग्रेडेड वैशिष्ट्ये व सुधारित डिझाइनसह एसपी १२५ ही १२५ सीसी कम्यूटर मोटरसायकल विभागात बेंचमार्क स्थापित करते. एचएमएसआयमध्ये आम्ही ग्राहकांना मूल्य व उत्साहपूर्ण राइडिंगचा आनंद देण्याप्रती कटिबद्ध आहोत आणि एसपी १२५ मधून ग्राहक समाधानाप्रती आमची समर्पितता दिसून येते.’
त्सुत्सुमू ओटनी
व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, एचएमएसआय
एसपी १२५ : प्रगत वैशिष्ट्ये आणि नवीन रंग
१२५ सीसी मोटरसायकल श्रेणीमधील तरूणांसाठी स्टाइल दर्जामध्ये क्रांती घडवून आणत अपडेटेड एसपी१२५ सुधारित डिझाइन व प्रगत कनेक्टीव्ही वैशिष्ट्यांसह साहसी स्टेटमेंट करण्यासाठी सादर करण्यात आली आहे. या बाइकमध्ये नवीन ऑल-एलईडी हेडलॅम्प व टेललॅम्प, तसेच आक्रमक टँक श्रॉड्स, क्रोम मफलर कव्हर आणि सुधारित ग्राफिक्स आहेत. ही वैशिष्ट्ये बाइकला लक्षवेधक बनवतात.
ही बाइक दोन व्हेरिएण्ट्स ड्रम व डिस्कसोबत पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल – पर्ल इग्निअस ब्लॅक, मॅट अॅक्सिस ग्रे मेटलिक, पर्ल सिरेन ब्लू, इम्पेरिअल रेड मेटलिक आणि मॅट मार्वल ब्ल्यू मेटलिक. नवीन एसपी१२५ मध्ये आता ४.२-इंच टीएफटी डिस्प्लेसह ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हीटी आणि होंडा रोडसिंक अॅप सुसंगता आहे, ज्यामुळे स्मार्ट राइडसाठी सुलभ नेव्हिगेशन व वॉईस असिस्ट मिळते. तसेच, भर करण्यात आलेले यूएसबी टाइप-सी चार्जिंग पॉइण्ट आधुनिक काळातील राइडर्सच्या गरजांची पूर्तता करते.
एसपी १२५ मध्ये १२४ सीसी, सिंगल सिलिंडर, फ्यूएल-इंजेक्टेड इंजिनची शक्ती आहे, जे आगामी सरकारी नियमानांची पूर्तता करण्यासाठी आता ओबीडी२बी प्रमाणित आहे. ही मोटर ८ केडब्ल्यू शक्ती आणि १०.९ एनएम सर्वोच्च टॉर्कची निर्मिती करते, तसेच ५-स्पीड गिअरबॉक्स आहे. या बाइकमध्ये इडलिंग स्टॉप सिस्टम आहे, जी वाहतूक कोंडीमध्ये व इतर थांब्यावर इंजिन बंद करत इंधन कार्यक्षमता वाढवते.
नवीन एसपी १२५: किंमत आणि उपलब्धता
नवीन २०२५ होंडा एसपी १२५ ची किंमत 91,771 रूपयांपासून, (एक्स-शोरूम दिल्ली) सुरू होते. ही बाइक आता भारतभरातील एचएमएसआय डिलरशिपमध्ये उपलब्ध आहे.
‘एसपी१२५ तिच्या श्रेणीमधील सतत सर्वात लोकप्रिय मोटरसायकल राहिली आहे आणि या नवीन अपग्रेडसह आम्ही या बाइकची स्टाइल, कार्यक्षमता व सोयीसुविधेमध्ये अधिक सुधारणा केल्या आहेत. ब्ल्यूटूथ नेव्हिगेशन, वॉईस असिस्ट आणि यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये असलेली ही बाइक आजच्या तंत्रज्ञान-प्रेमी राइडर्सच्या मागण्यांची पूर्तता करेल. आम्हाला विश्वास आहे की, नवीन एसपी१२५ तिच्या प्रीमियमनेससह तरूणांचे लक्ष वेधून घेण्यास आणि १२५ सीसी मोटरसायकल सेगमेंटला नव्या उंचीवर घेऊन जाण्यास सज्ज आहे.’
योगेश माथूर
संचालक (विक्री व विपणन), एचएमएसआय