– वीज उपकेंद्राच्या आगजनीत हिथ्रो एयरपोर्टवरील १३०० विमाने रद्द
व्यापार हिंदूस्थान प्रतिनिधी
मुंबई
नैसर्गिक किंवा कृत्रिम आपत्ती कोणावरही येऊ शकते, मग तो कितीही मोठा, श्रीमंत देश असू द्यात. एक वीज उपकेंद्र (इलेक्ट्रिसिटी वितरण करणारी जागा) आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलं आणि लंडनमधलं हिथ्रो एयरपोर्ट २४ तासांसाठी ठप्प झालंय. १३०० हून अधिक विमाने रद्द किंवा इतरत्र भटकत आहेत.
पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे, ये-जा करणाऱ्या प्रवाशांचा मुख्य थांबा हिथ्रवोवर असतो. त्यामुळे ताशी ४४ ते ४६ विमानांची येथे ये-जा असते. दिवसागणिक १३०० विमानं या एयरपोर्टवर उतरतात आणि हवेत झेपावतात. मात्र ती ये-जा एका आगीमुळे बंद पडली आहेत.
तिथल्या म्हणजेच लंडनच्या वेळेनुसार गुरूवार, २० मार्चला वीज उपकेंद्राला आग लागली, त्याबरोबर एयरपोर्टकडे येणारी वीजही थांबली. एयरपोर्ट अंधारात गेल्याने एटीसी, रडार बंद झाले. पायलट्सशी संपर्क बंद झाल्याने अख्खा एअयरपोर्टच शुक्रवारी रात्री ११.५९ पर्यंत बंद करावं लागलंय, तशी घोषणाच तिथल्या प्रशासनानं केलीय. त्याचा मुंबई-लंडन, दिल्ली-लंडन या विमानांना फटका बसला. दोन्हीकडून उडणारी चार विमाने रद्द झाली. दोन विमाने युरोपातल्या झुरीच (जर्मनी) आणि फ्रँकफर्ट (जर्मनी) एयरपोर्टवर उतरविली गेली आहेत.