व्यापार हिंदूस्थान प्रतिनिधी
मुंबई
विधानसभा निवडणुकीचे मतदान तोंडावर आले असताना काही राजकीय पक्षांकडून जाणूनबुजून आम्हीदेखील ‘महायुती’चे भाग आहोत, अशी वल्गना करीत मतदारांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. मात्र ‘महायुती’ मध्ये प्रमुख पक्ष केवळ तीनच आहेत. तर महाविकास आघाडीमध्येही प्रमुख पक्ष केवळ तीनच आहेत, हे मतदारांनी जाणून घ्यायला हवे.
लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीचा भाग राहून त्यांना जुजबी सहकार्य केलेल्या एका पक्षाकडून स्वत: पराभूत होत असल्याच्या भीतीपोटी आपण आता पुन्हा महायुतीचाच भाग असल्याचा आभास निर्माण करुन मते खेचण्याचा प्रयत्न होत आहे. थेट नागपूरहून आदेश आल्याचा खोटा संदेश सोशल मीडियावर टाकला जात आहे. मात्र साफ व अत्याधिक खोटे असून तो पक्ष महायुतीचा भाग नाही, हे मतदारांनी जागृत राहून जाणून घेण्याची गरज आहे.
महायुतीतील प्रमुख पक्ष
पक्ष चिन्ह
भारतीय जनता पक्ष कमळ
शिवसेना धनुष्यबाण
राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ